पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,लोटस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजयाची घोडदौड चालू ठेवली आहे. विद्यार्थी ऋतुराज ताड विद्यार्थिनी सानिका ताठे सोलापूर सहोदया कॉम्प्लेक्स अंतर्गत घेण्यात आलेल्या अथलेटिक स्पर्धेमध्ये वय वर्ष १७ गटामधून ऋतुराज ताड याने थाळीफेक मध्ये प्रथम क्रमांक तर गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे.आणि १४ वय वर्ष गटातून सानिका ताठे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षिका अस्मिता घोलप आणि क्रीडा शिक्षक गजानन व्यवहारे, विभाग प्रमुख सचिन निकम यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धा शिवरत्न पब्लिक स्कूल अकलूज येथे पार पडल्या स्पर्धेसाठी एकूण ९ शाळानी सहभाग नोंदविला आणि एकूण स्पर्धेसाठी २२५ खेळाडू उपस्थित होते.या सर्व स्पर्धकांमधून लोटस इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला.अशी माहिती स्कूलच्या प्राचार्या आणि सहोदया कॉम्प्लेक्सच्या अध्यक्षा डॉ.जयश्री भोसले यांनी दिली.तर या विद्यार्थ्यांना सहोदया कॉम्प्लेक्स तर्फे अनुक्रमे गोल्ड मेडल व सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम. बागल, उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले. तसेच पालक वर्ग, शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील अभिनंदन केले.