सोलापूर शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आव्हान.
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान करण्यात येते की, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्याचे राज्यपाल यांच्याकडून वारंवार होत असलेल्या राष्ट्रीय महापुरूषांचे होत असलेले अपमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने दि. १६/१२/२०२२ शुक्रवार रोजी सकाळी ते दुपारी २ वाजेपर्यंत सोलापूर बंद पुकारला आहे. त्यास सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे.
तरी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, महिला आघाडी, संघटक ,समन्वयक, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसेना अंगीकृत युवासेना, युवती सेना, विद्यार्थी सेना, रिक्षासेना, महिला आघाडी, वैद्यकीय मदत सेना, कामगार सेना व शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी दि. १६/१२/२०२२ शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता श्री. शिवाजी चौक, येथील श्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास मानवंदना करण्यासाठी उपस्थित रहावे. असे आव्हान जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे शहरप्रमुख विष्णुकारमपुरी(महाराज) यांनी केले आहे.