भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी व पंचक्रोशीतील सर्व राम भाविकांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की कार्तिक शुद्ध पौर्णिमेपासून कार्तिक वद्य षष्ठी पर्यंत सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत श्रीराम मंदिर, सद्गुरू काशिनाथ महाराज समाधी, आणि श्री मारुती मंदिर शुक्रवार पेठ , भाळवणी येथील राम मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहेत.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सद्गुरू काशिनाथ महाराज रामदासीयांच्या पुण्यतिथी निमित्त सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर पासून रविवार दिनांक १३ नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी ७ वाजले पासून रात्री ८ वाजेपर्यंत श्रीराम मंदिर भाळवणी येथे श्रीराम जय राम जय जय राम या रामनामाचा जप आयोजित करण्यात आला आहे. तरी भाविकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या सोयीनुसार मंदिरात येऊन जप करावा.
या वर्षी सद्गुरू काशिनाथ महाराज रामदासी यांची ४९ वी पुण्यतिथी आहे. पुढील वर्षी संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करावयाचा मानस आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.तसेच राम भक्तांनी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कल्याण कलढोणे (9766477031) यांनी केले आहे.