सोलापुर प्रतिनिधी
सोलापुर शहरातील होमकर नगर येथील १६ वर्षीय कु. किर्ती नंदकुमार भराडिया हिने मुंबई येथील अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे समुद्री ३८ किलोमीटरचे अंतर सलग न थांबता ७ तास २३ मिनिटात पुर्ण करुन विश्व विक्रम स्थापित केला. याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते कु. किर्ती चा सत्कार करण्यात आला. आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मा. नगरसेवक विनोद भोसले, मा. सोमपा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, शाहू सलगर, सुभाष वाघमारे, सुनील सारंगी, राजेंद्र शीरकुल, सौरभ साळुंखे यांच्यासह किर्तीचे वडील नंदकिशोर भराडिया, कुटुंबीय, मित्रमंडळी उपस्थित होते.