पंढरपूर प्रतिनिधी
मद्यधुंद टिपर चालकाचे सुटले नियंत्रण, टिपर शिरला डायरेक्ट घरात,पंढरपूर-जुना अकलूज रोडवरील अत्यंत थरकाप उडवणारी घटना...!!
पंढरपूर जुना अकलूज रोडवरील वाडीकुरोली येथील रस्त्याच्या लगत असलेल्या कुमार काळे यांच्या घरात भरधाव वेगाने जाणारा टिपर घुसल्याने परिसतात एकच खळबळ उडाली,प्रचंड मोठ्या आवाजाने ग्रामस्थ तात्काळ काळे यांच्या घराकडे धावू लागले,टिपर चा वेग इतका भरधाव होता की आख्ख घर टिपरच्या धडकेने उध्वस्त झाले असून पलीकडच्या खोलीत अभ्यास करत असलेली बाळं या अपघातून बाल बाल बचावली, मात्र प्रचंड मोठ्या आवाजाने मुलं भेदरून गेली.
गादेगाव येथील व्यावसायिक बागल यांचा टिपर जो बांधकाम मटेरियल सप्लाय करत होता, आज मुरुमाची खेप खाली करून तो जुना अकलूज रोड मार्गे गादेगाव च्या दिशेने अगदी भरधाव निघाला होता, मात्र ड्राइव्हर मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटले आणि सदर गंभीर अपघात घडला...
दैव बलवत्तर म्हणून त्या वेळेस टिपर घुसलेल्या खोलीत कोणी नव्हते अन्यथा अनर्थ घडले असते...
मागील वर्षभरात रस्त्याची कामे चालू असल्यामुळे वाखरी, शिरढोन, कौठळी,खेड भाळवणी, शेळवे, वाडी कुरोली, पिराची कुरोली,भंडीशेगाव या परिसरातून वेगवेगळ्या ठेकेदारांचे खडी, सिमेंट, मुरूम, वाळू इ.वाहणारे अवजड टिपर धुरळा उडवत रस्त्यावरील विध्यार्थी असो की वयोवृद्ध माणसं कोणाचीही तमा न बाळगता भरधाव वेगाने वाहतात,त्यातील बहुतेक चालक व्यसनी,मद्यपी असतात त्यांच्या मालकांचे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नसते आणि त्यामुळे असे अपघात होत राहतात, पण याची दखल ना वाहतूक सुरक्षा विभाग घेतो, ना वाहतूक पोलीस घेतात, टिपर मालक, ठेकेदार तर सरळ अरेरावीची भाषा करतात, चांगल्या रस्त्याचे वाटोळे करण्याचे काम हे ओव्हर लोडेड टिपर अन ट्रॅक्टर करत असतात...
शासन प्रशासन नुसतेच रस्ते सुरक्षा सप्ताह सारखे कागदोपत्री कार्यक्रम राबवते मात्र खऱ्या अर्थाने रस्त्यावर वावरणाऱ्या वाटसरूंची,रस्त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाची सुरक्षेची हमी कोण घेणार..???? हा प्रश्न नागरिकांमधून येत आहे....