भाळवणी प्रतिनिधी
आज ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने चंद्रभागा सहकार शिरोमणी साखर कारखाना भाळवणी येथे गेट बंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी ऊसाची पहिली उचल 2500 रूपये व 3100 रूपये मिळाले पाहिजे गेली पंधरा दिवस झाले हे आंदोलन चालू आहे आता आंदोलन उग्र करण्यात येणार आहे जे साखर कारखानदार पहिली उचल 2500 जाहीर करणार अशा कारखान्याच्या चेअरमनला आडवून जाब विचारणार आहे आणि आम्ही ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे नुकसान करणार नाही पंरतू चेअरमनला सळो की पळो करून ऊस उत्पादक शेतकर्यांना न्याय देऊ.
यावेळी दिपक भोसले,समाधान फाटे,माऊली हळणवर, माऊली जवळेकर, तानाजी बागल,सचिन आटकळे,अजित बोरकर,रणजीत बागल,कांतीलाल नाईकनवरे,निवास नागणे ,सचिन नागणे ,बाळू जगदाळे, शिवराम गायकवाड, शरीब तांबोळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.