चिंचणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यात प्रती महाबळेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या चिंचणी कृषी पर्यटन केंद्रात ग्रामीण प्राथमिक वस्तू संग्रहालय उभारणीचे कार्य सुरू आहे या संग्रहालयात ग्रामीण भागात असणाऱ्या व शेती आवश्यक असणाऱ्या जुन्या वस्तूंचा संग्रह करण्यात येणार आहे.
ही सुंदर इमारत संग्रहालयाची असुन याचे काम पूर्ण झालेले आहे.या संग्रहालयामध्ये आपण जातं,उखळ,व्हण,पाठा-वरवंठा,मुसळ,रवी,कणींग,इरल,डाल,कुयीन,वावडी,मोट-नाडा,पवरा,राहट,बळीनांगर,कुळव,गाडवान,डिचकं,रांजण,काटवट,तप्यालं, पाळणा,पितळी भांडी,जुनी बैलगाडी, अशा अनेक कालबाह्य झालेल्या ग्रामीण वस्तू ठेवणार आहोत.
या पैकी मिळेल किंवा मिळेल त्या वस्तू गोळा करण्याचे काम सध्या सुरु आहे. अशा अनेक वस्तू आपणाकडे असतील किंवा अडगळीत पडलेल्या असतील तर आम्हाला सांगा.
आपण त्या सर्व वस्तू या संग्रहालयात संग्रहीत करूया. येणाऱ्या नविन पिढीला त्याची ओळख करून देऊया. एखाद्या गावामध्ये ग्रामीण वस्तूंचं संग्रहालय उभं राहणं ही बहुदा पहिलीच कल्पना असावी. हे संग्रहालय अनेक ग्रामीण वस्तूंची फक्त ओळखच करून देणार आहे असं नाही. तर ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचा वारसा सांगणारं सुद्धा आहे. चला तर मग अशा काही वस्तू आपणाकडे असतील तर आम्हाला नक्की कळवा .त्याकरिता संपर्क 9860959565 / 9970524080 या नंबरवर करावा असे आवाहन मोहन अनपट यांनी केले आहे.