सोलापूर प्रतिनिधी
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांना अवमान कारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा धोतर फेडणाऱ्यांला सोलापूर शिवसेना वतीने १ लाख ५१ हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. असे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी जाहिर केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुदांसु तिवाडी यांनी शिवरायांच्या बाबतीत अवमान कारक वक्तव्य करून संपुर्ण हिंदुस्थानातील शिवभक्तांचे भावना दुखाविले आहेत. त्यामुळे राज्यपाल्यांची ताबडतोब हकालपट्टी करा. व तिवाडी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सोलापूर शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी मिल का पत्ता कडवा है – कोश्यारी, तिवाडी भडवा है. चले – जाओ, चले - जाओ कोश्यारी चले जाओ, कोश्यारी हाय – हाय, तिवाडी हाय – हाय, देवेंद्र फडणवीस हाय – हाय, भाजपा हाय – हाय, शिवसेना जिंदाबाद, उध्दवसाहेब तुम्ह आगे बढो – हम तुम्हारे साथ है. अशा घोषणा दिल्या.
जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय (पंत) वानकर, उपशहरप्रमुख सुरेश जगताप, लहु गायकवाड, संदीप बेळमकर, अमित भोसले, संताजी भोळे, अजय खांडेकर, अनिल कोंडूर, विजय पुकाळे, समन्वयक भैय्या धाराशिवकर, गणेश कुलकर्णी, शुभम स्वामी, रेवण बुक्कानुरे, संभाजी कोडगे, प्रशांत जक्का, विठ्ठल कुऱ्हाडकर, आबा सावंत, दिपक गवळी, बाळु पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.