पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुरातील खऱ्या अर्थाने नाट्य चळवळ सुरुवात झाली ते ठिकाण म्हणजे कपोळ धर्मशाळा येथे पंढरपुरातील ज्येष्ठ रंगकर्मी व सर्वाचे सदैव मार्गदर्शक विनय महाराज बडवे यांच्या हस्ते श्री नटराज मुर्तीचे पूजन करण्यात आले.
त्याप्रसंगी पंढरपुरातील प्रसिद्ध रंगकर्मी श्याम सावजी, पद्मा दवे -सावजी, जेष्ठ रंगकर्मी निर्मला भिंगे पोलीस इन्स्पेक्टर व कलाकार दत्तात्रेय जगताप लोकप्रवाह न्यूज चॅनलचे संपादक व कलाकार रवी शेवडे स्वरांजली ऑर्केस्ट्राचे संस्थापक व कलाकार गणेश गोडबोले , प्रमोद राजहंस ,संतोष शिरगिरे व इतर कलाकार मित्र मंडळ व सर्व नाट्य कलाकार मिळून आज मराठी रंगभूमीदिन साजरा केला.
यावेळी खूप नव्याजुन्या नाट्य चळवळीतील प्रसंगावरती मनमुराद चर्चा झाली. जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला.पंढरपुरातील बऱ्याच ज्येष्ठ रंगकर्मी तसेच आमचे समवयस्क रंगकर्मींची आठवण झाली व त्याचे काही किस्स्यावरती गप्पाही झाल्या. तसेच काही नवीन संकल्पावर खूप चर्चा झाली.
सर्व नाट्यप्रेमी रसीकप्रेक्षकांना व रंगकर्मींना मराठी रंगभूमीदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.