मंगळवेढा प्रतिनिधी भैय्या खिलारे
मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय या नुतन वास्तूचे उदघाटन आज गुरुवार दि.17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.00 वा.सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होत असल्याची माहिती डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी दिली.
मंगळवेढा तहसील कार्यालयाजवळ नव्याने डी.वाय.एस.पी.कार्यालयाची इमारत उभारण्यात आली असून या कार्यालयाचे उदघाटनासाठी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा.ओमप्रकाशराजे निंबाळकर,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,आ.अरूण लाड,आ.जयंत आसगावकर,आ.सुभाष देशमुख,आ.बबनराव शिंदे,आ.विजय देशमुख,आ.प्रणिती शिंदे,आ.शहाजी पाटील,आ.राजेंद्र राऊत,आ.संजयमामा शिंदे,आ.यशवंत माने,
आ.समाधान आवताडे,आ.सचिन कल्याणशेट्टी,आ.राम सातपुते , कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया,
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव आदी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पोलिस निरिक्षक रणजित माने व डी.वाय.एस.पी कार्यालयातील पोलिस उपनिरिक्षक अशोक बाबर, सहाय्यक फौजदार राजेंद्र जावळे,
दत्तात्रय तोंडले, पोलिस हवालदार शिवाजी पवार, महिला पोलिस नाईक वंदना अहिरे आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.