भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथे 'शाही दम बिर्याणी'चा सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
येथील कारंजकर शॉपिंग सेंटर येथे सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र पुरोगामी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख,विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील, बाळासाहेब माळी, दीपक पवार, ई. बा.मुलाणी,भगवान चौगुले,शिवाजी बाबर, धैर्यसिंह नाईक निंबाळकर,सरपंच राजकुमार पाटील,विजय शिंदे, सुनील पाटील,गोरख लिंगे,जयराम शिंदे,अर्जुन लिंगे,शशिकांत विभुते,किशोर खरडकर,बाळासाहेब देशमुख, निहाल शेख,संजय बाबर,धोंडिराम शिंदे,मुसा शेख, कैलास गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले,आजकाल युवक नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय सुरू करीत आहेत. ही चांगली गोष्ट आहे.युवकांनी व्यवसाय करताना काळजी घ्यावी म्हणजे यश मिळते.
यावेळी अभिजित पाटील म्हणाले,लिंगे परिवाराने अत्यंत आत्मीयतेने सुरू केलेल्या या 'बिर्याणी स्पेशल' हॉटेलला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सद्दाम सय्यद यांनी केले तर आभार अमोल लिंगे यांनी मानले.यावेळी लिंगे परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महात्मा फुले युवक संघटनेच्या सदस्यांनी प्रयत्न केला.