शेळवे प्रतिनिधी संभाजी वाघुले
राज्यभरात मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्व.उमेशचंद्र खेडकर स्मृती चषक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सणराईज पब्लिक स्कूल,शेळवे च्या कु.पूर्वा बिभीषण साळुंखे हिने बाल गटात तृतीय क्रमांक मिळवून विशेष नैपुण्य प्राप्त केले, प्रशालेतील एकूण १२ विध्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.प्रत्येकांनी आपलं कौशल्य पणाला लावून वक्तृत्व सादर केलं, सदर स्पर्धेत सर्व गटातून एकूण २५० च्या वर स्पर्धक सहभागी झाले होते.या पूर्वी ही २०१६-१७,२०१८ व २०१९ सलग चार वर्षे सणराईज पब्लिक स्कूल, शेळवे च्या विध्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटातून नेत्रदीपक यश मिळवलं होतं,२०२० व २०२१ या सलग दोन वर्षात कोरोनाच्या प्रारधुरभावामुळे स्पर्धा होऊ शकल्या नाहीत मात्र या वर्षी स्पर्धा अतिशय दिमाखात पार पडली,सदर स्पर्धेत विजेता होण्याची ओढ सर्व स्पर्धकांना असते आणि ती परंपरा सणराईज पब्लिक स्कूल, शेळवे ने कायम ठेवली या बद्दल प्रशालेचे व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरे,सचिव अंकुश गाजरे उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले,तसेच सर्व विध्यार्थ्यांना सहशिक्षक मोहन गायकवाड, सौ. मनिषा गोरे, दिपाली कुंभार,उषा लामकाने,प्रियंका गाजरे, आरती सुरवसे, सुफीया नदाफ,सोनाली गायकवाड,शितल पवार या सर्वांचे मार्गदर्शन लाभले, सर्व सहभागी विध्यार्थ्यांना स्व.उमेशचंद्र खेडकर चषकाचे सहभाग प्रशस्तीपत्र देण्यात आले तर विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढावे म्हणून सर्वांना प्रशालेकडून एक पेन व वही भेट देण्यात आली.
स्व.उमेशचंद्र खेडकर चषक वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक सोमनाथ गायकवाड व राजेश शहा, संजुभाई शहा यांच्या शुभहस्ते कु.पूर्वाला पारितोषिक प्रदान करण्यात आले प्रसंगी प्रशालेचे संस्थापक समाधान तुकाराम गाजरे, अंकुश गाजरे,अजित लोकरे तसेच सनराईज ऑफसेट चे समाधानभैय्या गाजरे, पालक प्रकाश साळुंखे उपस्थित होते.