पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड राजश्री नागणे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.