पंढरपूर प्रतिनिधी
राज्यात सहकार क्षेत्र विस्तारले असून ग्रामीण भागाचा तर तो कणा मानला जातो हे पाहता आता महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीने 25 व 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी सहकार निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती सहकार सेनेचे अध्यक्ष तथा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली .
पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता याचे उद्घाटन मनसे नेते बाळा नादंगावकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी माजी आमदार नितीन सरदेसाई ,मनसे नेते अविनाशक अभ्यनकर, मनसे नेते शिरीष सावंत ,माजी आमदार मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर हे नेते उपस्थित राहणार आहेत .या शिबिरात विविध विषयावर तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. 25 रोजी सेवा सहकारी संस्था नोंदणी व्यवस्थापन व कार्यप्रणाली या विषयावर दिनेश नाईक हे माहिती देणार आहेत, गृहनिर्माण संस्था या विषयावर दिवाकर कोयंडे हे मार्गदर्शन करतील याच दिवशी प्रबोधिनी भेट ग्रंथालय पाहणी व नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी मनसे नेते अनिल शिदोरे यांच्या उपस्थितीत समारोप होणार असून यावेळी मनसेचे नेते आमदार राजू पाटील, मनसे नेते अभिजीत पानसे ,मनसे नेते संजय चित्रे ,मनसे नेते राजेंद्र बाविस्कर ,महिला आघाडीचे नेते शालिनीताई ठाकरे ,रिटाताई गुप्ता ,शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष भाऊ नागरगोजे, अशोक तावरे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन सुरवात होणार आहे .
या दिवशी डॉक्टर शशी ताई अहिरे या कृषी विषयक सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करतील तर सहकारी वित्तीय संस्था या विषयावर तर सल्लागार उदय कर्वे विचार व्यक्त करतील तर विजय जोशी महिला सेवा संस्था व बचत गट या विषयाची माहिती देणार आहेत .या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास भाषण या विषयावर रवींद्र साठे मार्गदर्शन करणार आहेत . या शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.