पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे पंढरपूर येथे.सोलापूर सोहदया कॉम्प्लेक्स अंतर्गत सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सोलापूर सोहदया कॉम्प्लेक्सच्या अध्यक्षा आणि प्रमुख पाहुण्या म्हणून लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले उपस्थित होत्या. तर ट्रेजर अरिहंत पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल सुप्रिया बहिरट उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवेचे प्रिन्सिपल एस.एन.दास हे होते. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते सरस्वती पूजन,आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ८ शाळा सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेसाठी एकूण १८ विद्यार्थी सहभागी झाले होते. लहान गटातून प्रथम क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी चे विद्यार्थी यांचा प्रथम क्रमांक आला तर मोठ्या गटातून लोटस इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी श्रावणी वाडदेकर हिचा प्रथम क्रमांक आला.तर द्वितीय क्रमांक अरिहंत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याचा आला विजयी विद्यार्थ्यांना लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले आणि अरिहंत पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल सुप्रिया बहिरट तसेच कर्मयोगी पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल एस. एन.दास यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कर्मयोगी पब्लिक स्कूलच्या कॉर्डिनेटर स्वाती धवणे मॅडम आणि काजल मॅडम यांनी केले.स्कूलच्या विजय विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.