मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आयोजित केलेल्या कोकणी मालवणी जत्रोत्सवात दि ८ नोव्हेंबर, २०२२ रोजी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील विविध क्षेत्रातील लोकांनी आपापल्या परीने कोरोना महामारीच्या काळात रुग्णसेवा, सामाजिक कार्य करून एक महत्वाची भूमिका बजावली. अश्या योद्धाचा सन्मान केला.
मनपाच्या सार्वजनिक आरोग्य सेविका सायली मिर्लेकर यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन तसेच शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करताना आमदार रविंद्र वायकर यांनी स्वतः माईक हातात घेऊन सायली मिर्लेकर यांच्या कार्याची स्तुती केली.
मुंबईत पहिला कोरोनाचा रुग्ण जोगेश्वरीतील स्कवॉटर्स कॉलोनी आरोग्य केंद्राच्या विभागात आढळला होता. तेंव्हा पासून सायली मिर्लेकर यांनी धाडसाने आपल्या आरोग्य केंद्रातील स्वयंसेविकांच्या सहकार्याने रुग्णांना दिलासा देण्यासाठी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. या कार्याचा गौरव करून समाजातील सर्व घटकातील कोविड योद्धाचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
याप्रसंगी विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, वॉर्ड क्र. ७४ च्या शाखा संघटक रश्मी गोडांबे, शाखा समन्वयक योगित पाटील, उमेश कदम, कार्यालय प्रमुख राजेंद्र पवार, अनिल म्हसकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.