भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकरी गणेश गवळी यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करून यशस्वीपणे पीक घेतले आहे.
यावेळी गवळी म्हणाले की स्ट्रॉबेरी चे उत्पन्न फक्त महाबळेश्वर परिसरात घेतले जाते पण चालू काळात शेतीत नवीन उत्पादन पिकाची लागवड करून नवनवीन प्रयोग केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपल्या परिसरात मी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे तसेच नवीन शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची उत्पन्न घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
गवळी यांनी ऑनलाइन पद्धतीने स्ट्रॉबेरीची विक्री सुरू केली असून प्रथम ग्राहक म्हणून डॉक्टर नंदकुमार जगताप यांना स्ट्रॉबेरीचे पार्सल घरपोच करण्यात आले.
यावेळी सरपंच राजकुमार पाटील, चंद्रभागाचे माजी संचालक दीपक गवळी, मंगेश शिंदे दीपक गवळी शरद लिंगे सचिन लिंगे इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्या ग्राहकांना ऑनलाइन स्ट्रॉबेरी पाहिजे त्यांनी गणेश गवळी ९७ ३० ६२ ५९ ०० या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.