सय्यद वरवडे प्रतिनिधी
सय्यद वरवडे ता. मोहोळ येथे भीमा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त मा. अजिंक्यराणा पाटील यांनी सय्यद वरवडे येथिल शेतकरी सभासद व ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी अजिंक्यराणा पाटील यांनी १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भिंतीवरील घड्याळाच्या चिन्हासमोर शिक्का मारुन भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना अजिंक्यराणा पाटील यांनी आपल्या पॅनलची सत्ता आल्यावर शेतकरी सभासद, कामगार, यांचे बिलाचे व वेतनाचे सर्व प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे आश्वासन पाटील दिले.
दरम्यान सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या अधिसभा (सिनेट) सदस्यपदी मा. अजिंक्यराणा पाटील यांची निवड झाल्याबद्दल सय्यद वरवडेकर ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब शिंदे, हनुमंत कोरे, शिवाजी भोसले, बाळासाहेब कदम, शिवाजी कोरे, शिवाजी वाघमोडे, सलीम पाटील, मेहबूब मुजावर, आप्पा उकळे, सागर विरपे, वाल्मिक निळे, संजय खराडे, नामदेव कुचेकर (गुरुजी) आदींसह सय्यद वरवडे येथील सर्व सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.