पंढरपूर प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील महावि्यालयात सन 1977 ते 1982 या काळात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी सहकारी मित्रांनी गेट टू गेदरचे आयोजन केले होते.
यावेळी जवळ पास 62 विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
यावेळी सीमा अवसेकर म्हणाल्या ,नुकतेच kbp कॉलेज वर तब्बल 42 वर्षांनी आम्ही सगळे मुले, मुली, शिक्षक (आमचे पूर्वीचे,) भेटलो, शिक्षकांचा सत्कार केला दिवसभर, स्नेह संमेलन होते, समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला, मनोगत, गाणे, प्रत्येकाने सादर केले, त्यापैकी 3 जणांचा वाढदिवस पण तेथे केक कापून गाणे लावून साजरा करण्यात आला.
सर्वांचा शाल,श्रीफळ देऊन गौरवण्यात आले,विठ्ठल मूर्तीची आठवण म्हणून भेट दिली.
दिनेश शहा ने सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनींना एकत्र आणण्यासाठी खुप मेहनत घेतली, त्याच्या मुळेच आम्ही सर्वजण एकत्र, पुन्हा त्याच ठिकाणी येऊ शकलो.
सीमा अवसेकर, सीमा कुलकर्णी, पूर्वीची लता बहिरट, मोहोळकर, भारत वाघुले, गोवर्धन भट्टड, चंदनशिवे, दंदाडे सर्वांनीसुनीता चौगुले यांनी परिश्रम घेतले, सुनीता पुजारी,आशा बडवे, ज्योती उत्पात, विद्या जोशी सर्वजणी हजर होत्या, आमचे शिक्षक रेड्डी सर, थोरात सर, महाडिक मॅडम, काळे सर, (ट्युशन che) कॉलेज चे प्राचार्य, उप प्राचार्य, आत्ताचे सर्वांनी पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला,सर्वांनी पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.यावेळी परत लवकरच भेटू या विचाराने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.