सोलापूर प्रतिनिधी
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील पदांसाठी दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे, असे उपसंचालक, भूमिअभिलेख किशोर तवरेज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता दिनांक ०९ डिसेंबर २०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार दिनांक ०९ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यानंतर सदर अर्जदार यांना विभागाकडून दिनांक २८ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमानुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.
परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिताची लिंक देखील दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.