हत्तूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील जनसेवा हिच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशनच्यावतीने यंदाची दिवाळी निराधार,अनाथ आणि वंचितांसोबत साजरी करण्यात आली.
जनसेवा हिच ईश्वरसेवा या व्हाट्सअप ग्रुपवर फाउंडेशनच्यावतीने केलेल्या आवाहनाला सर्व सदस्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. स्नेहालय प्रकल्प, कारंबा, प्रार्थना फाउंडेशनच्या वंचितांची शाळा मोरवंची व शहरातील मंदिराजवळील बेघर लोकांना आदी ठिकाणी २०० फराळाचे पाकीट संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटप करुन आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. सान्वी प्रविण विभुते हिच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालय येथील सर्व विद्यार्थिनींना वही, पेन्सिल, पेन, कंपास सेट, कलर खडु आदी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राघवेंद्र पाटील, अमोघ पुजारी, सुभाष डोगे, महेश अवताडे, सुभाष उकले, अनिल पवार, प्रमोद कुलकर्णी, प्रदिप पाटील, संजय ममदापुरे, श्रेयस पाटील, समर्थ अवताडे, समर्थ हिरकुर, श्रीकांत भरले,साईनाथ अवताडे,ज्योतिबा पवार , विश्वनाथ ईश्वरकट्टी आदींनी परिश्रम घेतले.