प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये व व्दितीय पारितोषिक १५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले
सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई, कौशल्य रोजगार व उद्योजकता सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त उपक्रमातून दुसऱ्या टप्प्यातील बूट कॅम्प कार्यक्रमात केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेश भोगडे, सचिन बोरसे, हर्षवर्धन कोंडा, निखिल कुर्ले, रोहन दोडके या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले व संकेत गुरव, सुजाता दुधभाते,कोमल मोरे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात १३ ऑक्टोबर रोजी आयोजीत करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रम आणि व्यवसाय सादरीकरणामध्ये सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.या स्पर्धेत सोलापूर विद्यापीठात ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रोजेक्ट व इनोव्हेटिव्ह आयडिया सादर केली होती व त्यामधून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे व व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी विविध क्षेत्रातील उद्योजकांचे शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
याच अनुशंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट व इनोव्हेटिव्ह आयडिया या स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकता कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य रवींद्र व्यवहारे व शेखर जगदे, डॉ. प्रदीप तपकिरे,डॉ. दत्तात्रय गंधमल, प्रा. विजय बिराजदार,प्रा. सुनील शाखपूरे,प्रा.श्रीकांत जगताप व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिमान- संजय नवले
विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे व उद्योजक निर्माण करण्यासाठी सिंहगड नेहमीच प्रयत्नशील असते. तसेच उद्योजकतेला पुरक वातावरण निर्माण करण्यावर संस्थेचा कायम भर असतो.
- संजय नवले , कॅम्पस डायरेक्टर, सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर
सिंहगड मध्ये विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवण्यासाठी मेहनत घेतली जाते व त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप करून देण्यासाठी हवे ते सहकार्य महाविद्यालय करत असते .
- डॉ. शंकर नवले- प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर.