पंढरपूर प्रतिनिधी
तनाळी ता.पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री.कल्याण कुंभार (गुरुजी) यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तनाळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी पंचायत समिती सदस्य दादासाहेब मोटे, सरपंच विजय श्रीराम, उपसरपंच म्हाळाप्पा मासाळ, वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर मंगळवेढा चे उमेदवार बिराप्पा मोटे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर मोटे, सुधाकर मोटे, ज्ञानेश्वर लवटे, सदाशिव महादेव मासाळ , समाधान मोटे, अण्णा लवटे, विकास मदने, दत्ता मोटे, सदाशिव कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी कल्याण कुंभार गुरुजी यांचे कौतुक केले.