पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी या संस्थेचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्त मोठ्या उत्साहात पार पडला राष्ट्रवादी व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी या बँकेची स्थापना केली आहे.
समाजात आर्थिक सुबत्ता आली आहे आर्थिक चळवळ मोठी झाली आहे .तरीही गावागावात आणि शहरातील खाजगी सावकार की बिनभोगाट सुरू आहे त्यामुळे आर्थिक गरजा असणारे अनेक नागरिक समाजात आहेत .काही नागरिकांना सकाळी पैसा हवा असतो संध्याकाळी तो पैसा माघारी करतात अशी चक्र फिरत असल्याचे मत सोलापूर विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केले .
यावेळी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रमुख शिवाजीराव काळंगे , .सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील,विठ्ठल चे माजी चेअरमन भगीरथ भालके,पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश तात्या पाटील,धनश्री महिला मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई काळुंगे , माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे ,वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजाभाऊ शिंदे,यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे,प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत यलमार .विठ्ठलची माजी संचालक महादेव भाऊ देठे .भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे,विठ्ठलची माजी संचालक सुरेश दाजी बागल .विठ्ठल ची संचालक साहेबराव नागणे .दिनकर चव्हाण .गादेगाव चे उपसरपंच गणपत मोरे सर यूपी कंट्रक्शन चे उद्धव बापू बागल .विठ्ठल चे माजी संचालक शशिकांत बागल .गादेगाव चे माजी सरपंच महादेव फाटे .महादेव बागल .माजी सरपंच विकास भोसले .बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक पतसंस्था सोसायटीचे चेअरमन शांताराम गाजरे गुरुजी .विठ्ठल क्रेडिट सोसायटीचे माजी चेअरमन गणपत बागल .वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संभाजी बागल .तानाजी जाधव .शिवाजी जाधव भारत भुसे .सिताराम बागल इ. यावेळी श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेटचे चेअरमन नागेश फाटे म्हणाले की सक्षम उद्योगांच्या ठेवी आणि गरजू उद्योगजकांना कर्ज या संस्थेमार्फत देण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन दिले .
यावेळी कर सल्लागार राशिनकर यांनी निधी बँकेच्या संकलन संकल्पनेबाबतची माहिती दिली.तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश तात्या पाटील ,शोभाताई काळुंगे यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समाधान काळे यांनी मांनले