मोहोळ प्रतिनिधी
आज पापरी ता.मोहोळ येथे कु.ऋतुजा राजन पाटील या सोलापुर जिल्ह्यातुन पहील्या महिला पायलट झालेबद्धल,अजिंक्यराणा राजन पाटील यांची अहील्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ सिनेटवर निवड झालेबद्धल व डाॅ.बाबासाहेब देशमुख यांची रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड झालेबद्धल आयोजित सत्कार समारंभास विधान परिषद चे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने,मा.आ.राजन पाटील,जेष्ठ विधिज्ञ महादेव चौधरी,लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील,आण्णासाहेब देशमुख,नानासाहेब डोंगरे,प्रकाश चवरे,रणजित चवरे,पापरीच्या सरपंच जयश्रीताई कोळी,उपसरपंच अमोल भोसले आदि उपस्थित होते.