सोलापूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय हॅकाथॉन 'युनेस्को-भारत-आफ्रिका हॅकाथॉन' कॉम्पीटेशन साठी सामीया खालिद खान हिची निवड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात कोईम्बतूर तमिळनाडू येथे पार पडलेल्या 25 आणि 26 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकाथॉन आयोजित करण्यात आली होती. त्यामधे सिंहगड महाविद्यालयातील टीम नेक्स्ट_इंनोव्हेशन ने ती स्पर्धा जिंकली त्यानंतर सर्व विजेत्या संघांना 'युनेस्को इंडिया आफ्रिका' हॅकाथॉन चे ईमेल प्राप्त झाले.
युनेस्को इंडिया आफ्रिका हॅकाथॉन ची निवड त्यांनी मूल्यांकन चाचणी घेतली या स्पर्धा 'युनेस्को इंडिया आफ्रिका हॅकाथॉन' स्पर्धेसाठी शॉर्टलिस्ट केले, गौतम बुद्ध विद्यापीठ ग्रेटर नोएडा येथे २२ ते २५ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न होणार आहेत.या हॅकाथॉन स्पर्धेसाठी भारत व आफ्रिका यांच्यात टीम्स तयार करून त्यांची सलग ३६ तासांची कोडींग कॉम्पीटेशन होणार आहे. ज्यामध्ये नाविन्यपूर्ण विचारांचे बहु-प्रादेशिक/आंतरराष्ट्रीय सहकार्य समाविष्ट आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही या उपक्रमावर बारीक नजर आहे.
सामिया खान हिची निवड झाल्याबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रविंद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय गंधमल तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.