पंढरपूर प्रतिनिधी
श्रध्येय मोठे मालक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे , दिलीप अप्पा घाडगे यांच्या समवेत मोठ्या मालकांचे जेष्ठ सहकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला....!
या कार्यक्रमाचे सुरवातीस मोठ्या मालकांचे प्रतिमा पूजन करून पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले ..!
याप्रसंगी व्हा. चेअरमन कैलास खुळे यांनी सपत्नीक श्री सत्यनारायण महापूजा केली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर , मोठ्या मालकांचे सहकारी जेष्ठ सभासद , ऊस उत्पादक सभासद , शेतकरी ,अधिकारी ,कामगार वर्ग उपस्थित होते ...!
मोठ्या मालकांचे सर्व जेष्ठ सहकारी यांच्या फेटा बांधून सत्कार केला व मोठ्या मालकांची आठवण म्हणून सर्वांना मोठ्या मालकांची प्रतिमा देण्यात आली...!
यावेळी चेअरमन प्रशांत परिचारक म्हणाले,की सर्व जेष्ठ सभासद, शेतकरी सहकारी,कामगार या सर्वांच्या सहकार्य व आशीर्वादाने यंदाचे वर्षी हि आपन विक्रमी गाळप करून उसाला भाव देऊ या असा विश्वास व्यक्त करतो ..!