सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर दिनांक 20/10/2022 रोजी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघात येणार्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडणून येऊन शिवसेनेचा बालेकिल्ला ठरणार असे वकतव्य शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले.
शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हॉटेल ऐश्वर्या येथे झालेल्या उत्तर विधान सभा मतदार संघातील उपशहर प्रमुखाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी वरील उदगार काढले. पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस शहर प्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर समन्यवक भैय्या धाराशिवकर शहर संघटक अतुलराजे भंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रस्ताविकात संघटनात्मक बांधणीचे रुपरेषा सांगताना सोलापूर शहरातील शहर दक्षिण शहर मध्य व शहर उत्तर या तिन्ही मतदार संघात उपशहर प्रमुखांची वेगवेगळी बैठक घेऊन संघटना पुर्नबांधणी सुरु आहे असे म्हणाले.
यावेळी इतर पक्षातील अनेकचे कार्यकर्ते व नेते शिवसेत प्रवेश केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम बरडे साहेब पुढे म्हणाले की, महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी घरोघरी शिवसेना व शिवसेनेचे विचार पोहचवावे त्याचबरोबर केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकाने वाढविलेली महागाई व करीत असलेले हुकूमशाही कारभारा विरुध्द जनजागृती करा असे आव्हन केले.
सदर बैठकीत उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर समन्वयक महेश धाराशिवकर यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी विजय पुकाळे यांनी आभार मानुन बैठक संपल्याचे जाहीर केले.
सदर बैठकीत संभाजी भोळे, सुरेश जगताप, बाळासाहेब गायकवाड, लहु गायकवाड, अमित भोसले, निखिल जाधव, उज्वल दिक्षित, दिपक गवळी, शुभम स्वामी, सोमनाथ शिंदे, दिनेश चव्हाण संदिप बेळमकर, रतन खैरमोडे, शशिकांत बिराजदार, अमोल धर्माधिकारी, दिपक दळवे यांच्या सह शिवसेना पदाधिकारी मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
ः