पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची संलग्न असलेल्या सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची विक्रेता दिनानिमित्त बार्शी येथे बैठक होऊन पंढरपूर येथील ज्येष्ठ विक्रेते व अखिल भारतीय ग्राहक पंचायत उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर अध्यक्षपदी शिवलिंग मेढेघर सोलापूर यांची निवड करण्यात आली सुरुवातीस वृत्तपत्र विक्रेता ते मिसाइल मानते राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला वंदन करून बैठकीला प्रारंभ करण्यात आला.
संघटने विषयी राज्याचे कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांनी ध्येयधोरणे याबाबत माहिती दिली तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष महेश पटवर्धन होते सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सर्वच निवडी सर्वांमध्ये करण्यात आल्या.
यावेळी कार्याध्यक्षपदी अरुण कोरे सचिव पदी सचिन उर्फ बंटी बाबर खजिनदारपदी उत्तम चौगुले सदस्य पदी शाम थोरात सिद्धेश्वर सावंत अनिल खरात तसेच सल्लागारपदी महेश पटवर्धन यांच्या निवडी करण्यात आल्या यानंतर बार्शी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना ज्येष्ठ विक्रेता ते पत्रकार असा प्रवास केलेले उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी सांगितले
आपण जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकत्र येऊन आपल्यासाठी लढले पाहिजे याकरता सर्वांनी आपसातील मतभेद विसरून संघटनेत कार्यरत असावे संघटना मजबूत असले शिवाय आपला टिकाव लागणार नाही याकरता आपण विक्रेते बंधूनी जास्तीत जास्त संख्येने मग ते शहरातील असो वा ग्रामीण भागातील असो संघटनेचे सभासद होऊन संघटना मजबूत करावी असे आ वहान अध्यक्ष शिवलिंग मेढेघर व नंदकुमार देशपांडे यांनी केले आहे सर्व पदाधिकाऱ्यांना तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच साप्ताहिक ठिणगीचे संपादक रामचंद्र सरवदे यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत