पंढरपूर प्रतिनिधी
आमच्या संस्थेच्या मार्गदर्शक सचिव सुनेत्राताई विजयसिंह पवार याच्या संकल्पनेतुन दर वर्षी प्रमाणे इयत्ता १ ली ते ४ थी मुलांनी किल्ले तयार करण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यात सर्व मुलांनी सहभाग घेतला होता. सर्व परिसरातील साहित्य यांचा उपयोग केला. चिखल,पोथी , दगड गोळा करून सुंदर किल्ला तयार केला.
परिसरातील असणारी छोटी छोटी रोपे व गवत यांचा उपयोग केला. त्याचबरोबर मुलांनी कागदी झेंडे , मावळे व छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती यांचा वापर केला.
तोरणा किल्ला ,विशाळगड, शिवनेरी, रायगड,राजगड व प्रतापगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती मुलांनी तयार केल्या आणि खूप सुंदर असे सादरीकरण केले. या किल्ल्याच्या प्रतिकृती पाहुन मा.सौ.सचिव सो. प्र.मुख्याध्यापक कवडे व सर्व शिक्षकवृंद यांनी मुलांचे हार्दीक अभिनंदन केले.