मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्वेकडील वॉर्ड क्र.७३ चे नगरसेवक श्री प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाने संजय गांधी नगर व संत रोहिदास नगर येथील रहिवाशांकरिता आज दिनांक ४ ऑक्टोबर, २०२२ रोजी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सायली मिर्लेकर माता सुरक्षित तर घर सुरक्षित.
मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान या अभियानांतर्गत कलिमाता सेवा संघ जवळील शिवशक्ती नवरात्रोत्सव मंडळाने विभागातील माता आणि भगिनींच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याकरिता आरोग्य शिबीर आयोजित केले होते.
या शिबिराचा सुमारे ८० रहिवाश्यांनी लाभ घेतला.हे शिबिर यशस्वी करण्याकरिता स्कवाटर्स कॉलोनी आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.