सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले यांना सोलापूर शहर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुख्याध्यापक संघटनेने शहरातील नेताजी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार हुल्ले यांच्या आदर्शवत कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित केले.शिक्षण उपसंचालक विकास गरड, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष सुभाष माने, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार , प्रशासनाधिकारी संजय जावीर आदी प्रमुख अतिथींच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार, सहकारी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आंळगे, प्राध्यापक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.
कामगार मुलांच्या सेवेचा फळ
मुख्याध्यापक हुल्ले हे गेल्या ३० वर्षांपासून कामगार वसाहतीतील विद्यार्थ्यांना चांगले व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतल्याने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याची भावना संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी व्यक्त केली.