मायणी प्रतिनिधी
समाजातील निराधार, गरजू, गरिब, वंचित कुटूंबातील व्यक्तींचीही दिवाळी आनंदाची व्हावी व त्यांच्या चेहऱ्यावर आनंदीमय वातावरण निर्माण व्हावे या हेतूने स्पोर्टिंग सोल्स मायणी,शिवशाहू बहुउद्देशीय सामाजिक संस्था ,श्री. सावता बहुउद्दशीय कला क्रीडा प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य या तीन संस्थांच्या वतीने मायणीतील गरीब कुटुंबातील लोकांना दिवाळी फराळ किट देऊन गरिबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. गरिबांना दिवाळी फराळ किट वाटप करताना संस्थेचे सर्व सदस्य व मायणीं विभागातील सामाजिक कार्यकर्ते
सपोर्टिंग सोल्स मायणी,शिवशाहू बहुउद्देशीय सामाजिक संस्था ,श्री. सावता बहुउद्दशीय कला क्रीडा प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात.
दिवाळी सण सगळ्यांचाच गोड होत असतो असे नाही काहींना आपल्या घरी कधीच सण उत्सव साजरे करता येत नाहीत अशा गरीब कुटुंबातील लोकांचा या तीन संस्थेच्या काही सदस्यांनी शोध घेऊन त्यांची फराळची किट देऊन त्यांची दिवाळी गोड केली.संस्थेच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते ही दिवाळी फराळ किट देण्यात आली यावेळी संस्थेचे सर्व सदस्य व पत्रकार महेश जाधव उपस्थित होते.
आभार सामाजिक कार्यकर्ते सुरज मंडले यांनी ग्रुपमधील सर्व सदस्यांना शुभेच्छा देऊन असे वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या ग्रुपचे सहकार्य नागरिकांना लाभावे अशा कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यामध्ये आम्ही नेहमी सक्रिय राहु असा शब्द देऊन आभार मानले