सोलापूर प्रतिनिधी
ग्राम सवांद सरपंच असोसिएशन चे पदाधिकारी वार्षिक आढावा बैठक मागील वर्षी औरंगाबाद येथे पार पडली. आपण एक वर्ष राज्यभर सर्वांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. यावेळी वार्षिक आढावा २०२२ बैठकीचे नियोजन आपण 16 ऑक्टोबर रविवार रोजी पाचोरा जिल्हा जळगाव येथे केले आहे.
या मध्ये सभासद नोंदनी व नविन कार्यकारणी, पदाधिकारी निवड करण्यात येणार आहे.
आपणांस प्रामाणिकपणे ग्राम विकासावर काम करण्याची इच्छा असेल तसेच नवनवीन योजनांबद्दल माहिती, गावच्या विकासासाठी CSR फंड, नविन GR गाव विकास कामासाठी मिळणारा निधी याबद्दल व इतर खुप गोष्टी आपल्याला मिळतील जर आपल्याला ग्राम संवाद सरपंच असोसिएशन मध्ये तन-मन-धनाने काम करायचे असेल तर कार्यक्रमाला नक्की यावे.
विशाल पाटील लांडगे
प्रदेश सचिव
ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य, मो.9067404068