भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त व भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वाचकांना विविध ग्रंथ वाचनास उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचन शपथ घेतली.
यावेळी डॉ.धन्यकुमार गाजरे,सलीम शेख, सतीश पीसे पंकज वाघमारे अभिजीत जाधव सतीश कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.