पाचोरा प्रतिनिधी
ग्राम संवाद सरपंच असोसिएशन चा राज्य-पदाधिकारी वार्षिक आढावा बैठक पाचोरा जि.जळगाव येथील अशिर्वाद हॅाल येथे आयोजित करण्यात आला होता या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिनाथ धामणे पाटील होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाचोरा -भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी सघंटनेचे २०२१ या वर्षाचे कार्य अहवाल या पुस्तकाचे प्रकाशन करण्याच आले याबैठकीत प्रामुख्याणे सरपंच उपसरपंच तथा सदस्य तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी किशोर आप्पा पाटिल यांनी सांगितले की सरपंच महिला असेल तर पतीने त्यांच्या कामात ढवळाढवळ न करता महिलांना ग्राम पंचायताचा कारभार करायला मोकळीक दिली पाहिजे तरच महिला आरक्षणाचा फायदा होईल तसेच ग्राम संवाद सरपंच असोसिएशन चे ग्राम विकासाप्रती असलेली तळमळ पाहुन अप्पा म्हणाले की आपली सघंटना ही तळागळा पर्यंत पोहचली पाहीजे ग्राम सवांद सरपंच असोसिएशन चे अध्यक्ष यांनी केलेल्या मागण्यासाठी आपण पुढाकार घेऊन ग्राम संवाद सरंपच असोसिएशन चे पदाधीकारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची लवकरच बैठक घडवून देण्याचे आश्वासन किशोर अप्पा पाटील यांनी दिले.
या प्रंसगी ग्राम संवाद सरपंच असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष यांनी सघंटना का करावी लागली या संदर्भात बोलताना सांगितले की ग्रामीण भागात ग्राम पंचायत निवडणुका बहुदा राजकीय मतभेदातून नाही तर गावातील भावकी,गावातील जुने वाद तसेच सध्या सध्या वादातून जिरवा,जिरवी च्या नादात निवडनुक होत असते.आणी त्यातुंन निवडून असेले सरपंच, उपसरपंच,व सदस्य यांना शासकिय कामाचा फारसा अनुभव नसल्यामुळे गावाचा विकास होताना दिसत नाही आमची सघंटना ही ग्राम पंचायत निवडून गेलेले पदाधीकारी यांना त्यांचे अधिकार कर्तव्याची जाणीव करुन देण्याचे काम करत आहे गावातील विकासात मॅाडल सघंटनेकडे तयार असुन सघंटना राज्य भर काम करत आहे असे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी सांगितले.या बैठकीचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले होते.
दुसऱ्या सत्रात सभासद नोंदनी व पढील वाटचाल या साठीचे मार्गदर्शक सघंटनेचे उपाध्यक्ष श्री प्रमोद भगत यांनी केले तर जुनी जिल्हा कार्यकारणी बरखास्त करुन नव्याने जिल्हा अध्यक्ष निवडीचा ठराव संघटनेचे सचिव श्री विशाल लांडगे पाटील यांनी मांडला होता त्याला गंगा धांडारे यांनी अनुमोदन दिले ठराव एकमताने पास झाल्यानतंर लगेचच नवीन जिल्हा अध्यक्ष तसेच प्रदेश सरचिटणीस यांची निवड करण्यात आली.
सघंटना लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन राज्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांचे प्रश्न मुख्यमंत्री यांच्या कडे मांडनार आहे असे अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी सांगितले या प्रसंगी प्रस्थावीक विशाल लाडंगे यांनी केले तर आभार सुनिल वंजारी यांनी मानले.
या कार्यक्रमा साठी महिला प्रदेश अध्यक्ष कल्यानी राजस नंदाताई कुलसंगे, रिजवणा खान, अजितसिंह राजपुत श्री किरण घोंगडे,शिवशंकर काळे, निलेश पुलगमकर,अरुण भालेराव,किरण घोंगडे,दिंगबर धानोरकर,योगेश भोसले,किरण वेमुला,चंदू कापडी,महादेव विर,योगेश जाधव,अतुल घुगे,ऋषभ दुपारे,अजय काकडे,यशवंत मेश्राम, सुनिल राजमाने, सतिश भुई यांच्यासह राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मोहन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष डॉ. निळकंठ पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष राहुल पाटील राहुल धामणे अक्षय हगवणे व इतर पदाधीकारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यसस्वी केला