मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व बांद्रेकरवाडी येथील श्रीमती लक्ष्मीबाई वळंजू प्राथमिक शाळेतील १४० विद्यार्थ्याना दिवाळी निमित्त किराणा सामान, (तांदूळ डाळ, साखर साबण कोलगेट हेअर ऑईल, कलर पेटी, सैनीटायझर ) तसेच मिठाई बॉक्स व टॉवेल देऊन सहकार्य करण्यात आले.या शाळेत येणारी ही मुलं आरे कॉलनी येथील आदिवासी पाड्यातील असून अभ्यासात देखील हुशार आहेत.
मागील सहा-सात वर्षापासून जॉय सामजिक संस्थेच्या माध्यमातून या शाळेतील प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही विभागात मदत पोहचवली असून मार्च २०२० मध्ये जेव्हा लॉक डाऊन सुरू झाला तेव्हा देखील जुलै महिन्यात येथील साधारण ३५० विद्यार्थ्याना किराणा किट, मास्क सानितयझर, आरोग्य किट देण्यात आले होते.आज पुन्हा एकदा आमच्या विद्यार्थ्याना जॉय संस्थेने दिवाळी निमित्त केलेली मदत खूपच मोलाची असल्याचे मुख्यद्यापिका अर्चना निंबाळकर यांनी सांगितले व जॉय संस्था मागील सहा-सात वर्षापासून विद्यार्थ्याना मदत करीत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आपलं महनगर या लोकप्रिय दैनिकाचे संपादक संजय सावंत यांनी शिक्षण हा कोणत्याही गोष्टीचा मूलभूत पाया असून कोणीही शिक्षणापासून वंचित राहता काम नये.शिकलो तर आपल्याला नक्कीच पुढे जाता येईल असे सांगून जॉय संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करून त्यांना शाबासकी दिली.
जिकडे जिकडे गरज असेल तिकडे तिकडे आमची संस्था नक्कीच सहकार्य करेल व लॉक डाऊन पूर्वी व लॉकडाउन पासून जोमाने सुरू झालेलं आमचे हे कार्य यापुढेही असेच अविरतपणे सुरूच राहणार असल्याचे जॉय चे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले व ज्यांनी ज्यांनी जॉय संस्थेला सहकार्य केले अशा सर्वांचेच आभार मानले.
या वाटपासाठी आज वेळातवेळ काढून चंद्रशेखर सावंत, भूषण मुळये, शीलाताई येरागी, छायाताई राणे, असुंता डिसोझा, मीना भुतकर, अविनाश कर्गुटकर, मोनिका फर्नाडीस, सुचिता नार्वेकर, मृणाल मुळये, सीमा मिरजकर आदी जॉय चे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रायमरी च्या मुख्यद्यापिका अर्चना निंबाळकर, सेकंडरी सेक्शन चे मुख्याध्यापक मधुकर पोर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.