मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
ज्ञाति समाज,मुंबई संचालित बालविकास विद्यामंदिर जोगेश्वरी (पूर्व) प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शुभदा अशोक राणे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या.
मॅडमनी मुख्याध्यापिकेच्या कारकिर्दीत अनेक स्तुत्य उपक्रम राबवले .पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी रांगोळी, वेशभूषा स्पर्धांचे आयोजनही केले. कोविड कालावधीत गरजू पालकांना आर्थिक मदत तसेच मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली.
शाळेत दृकश्राव्य साधनां मधून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले.
त्यांना शाळेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले होते. अशा या उपक्रमशील मुख्याध्यापिकेला संस्थेच्या वतीने साडी, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सदिच्छा कार्यक्रम संस्थेचे उपकार्याध्यक्ष सहदेव सावंत, सरचिटणीस जितेंद्र पवार, चिटणीस सुरक्षा घोसाळकर व श्यशवंत साटम, प्रशासकीय अधिकारी अशोक परब, माजी का.सदस्य आप्पा शिंदे, शुभदा यांचे पती अशोक राणे, कुटुंबीय नातेवाईक सर्व विभागाचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सर्व उपस्थितांनी त्यांना सेवानिवृत्ती नंतरच्या सुखी व समाधानी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा तांबे यांनी केले तसेच कार्यक्रमाची सांगता संगीता देसाई यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.