पुणे प्रतिनिधी
श्री. संत नामदेव महाराजांच्या ७५२ व्या जयंती निमित्त नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेने अध्यक्ष संदिप लचके यांचे पुढाकाराने गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा या कीर्तन महोत्सवाचे सोमवार दि. ३१ आक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेपर्यंत आर.सी.एम. गुजराती हायस्कूल, दारूवाला पुलाजवळ, १४३३ कसबा पेठ, पुणे- ११ येथे आयोजन केले आहे.कलर्स मराठी वहिनीवर सध्या सुरू असलेल्या जय जय श्री स्वामी समर्थ मालिकामध्ये चोळाप्पाची भुमिका साकरणारे मा. श्री स्वानंद बर्वे यांचे प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. ३१ आक्टोबर २०२२ रोजी संजीव मेहेंदळे, कविता मेहेंदळे व सहकारी यांचा "भक्ती संगीत" कार्यक्रमाने सुरूवात होणार आहे.
मंगळवार दि.१ नोव्हेंबर २०२२ रोजी संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज डाॅ. सदानंद मोरे तसेच सध्या सोनी मराठी वाहीनीवर सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली मालिके मध्ये संत नामदेव महाराज यांची भुमिका करणारे मा. श्री. अवधुत सुधीर गांधी यांचे प्रमुख उपस्थितीत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज, ह .भ .प मुरारी महाराज नामदास (पंढरपूर) यांची नाचू किर्तनाचे रंगी... कीर्तन सेवा होणार आहे.
बुधवार दि.२ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारूदत आफळे गुरूजी यांचे नारदीय कीर्तन सेवा तर गुरुवार दि.३ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. नेहाताई भोसले (साळेकर) महाराज यांची गजर किर्तनाचा.. कीर्तन सेवा होणार आहे कृपया सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी केले आहे.