भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी रेशन दुकान नंबर- १ व २ तसेच प्रगती महिला बचत गट रेशन दुकान मध्ये आनंदाचा शिधा ( दिवाळी कीट) चे वाटप सुरू करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच राजकुमार पाटील,ग्राम.सदस्य नितीन शिंदे, प्रवीण गायकवाड,विजय शिंदे, कुमार भोसले, सुनील पाटील, मुसा शेख,प्रमोद माने, दिलीप भोसले,अरुण गायकवाड रेशन दुकानदार धोंडीराम शिंदे,माणिक शिंदे,संध्या गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
भाळवणी गावातील रेशन कार्डधारकाना ज्यांना ऑनलाईन धान्य मिळते त्यांना रवा .तेल .डाळ, साखर किट आनंदाचा शिधा १०० रुपये मध्ये वाटप रेशन दुकानात चालु आहे.लवकरात लवकर घेऊन जावे तसेच ज्या कार्ड धारकांनी किट नेली नाही त्यानी लगेच घेऊन जावे असे आवाहन रेशन दुकानदार शिंदे यांनी केले आहे.