आज मंत्रालयात सातव्या मजल्यावर अर्थात ख-या अर्थाने आरोग्य मंदिरात एक माता आपल्या दहा वर्षाच्या लेकराला (चि.सागर बाजीराव जाधव) घेवून आली.
त्या मातेच्या रुपात विजयादशमीच्या दुस-याचं दिवशी कोल्हापूरची महालक्ष्मी आई आमच्याकडे पन्हाळ्यावरुन आली होती. परमेश्वर भक्ताची कसोटी पाहत असतो. अगदी तसचं ही माता माझ्याकडे समस्या घेऊन आली. त्या लेकराचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचे होते. आजवर खर्चावाचून उपचार राहिलेले. ज्यावेळी लेकराची आई माझ्याजवळ व्यथा मांडत होती, त्यावेळी क्षणभर मीही अंतर्मनातून भावनिक होत होतो.
परंतु ज्या पदावर बसलो आहे, त्या पदाच्या खुर्चीवर डोळ्यामध्ये अश्रु आणण्याचा अधिकार नाही याचे भान असल्याने डोळ्यातील आसवांना तेथेच बंदिस्त करत, त्या आईला मुंबई मधिल एस.आर.सी.सी हॉस्पिटल मधून बोन मॅरो ट्रान्सप्लांट पूर्णपणे मोफत करुन देण्याचा शब्द दिला. त्या लेकराचे माय-बाप माझ्याकडे आनंदाने पाहत होते, संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार मानत होते.
तेंव्हा मा.मुख्यमंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला प्रत्यक्षात कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी आईचा आशिर्वाद मिळाल्याची भावना माझ्या श्रद्धाळू मनामध्ये आली. मनस्वी समाधान झाले.
श्री.मंगेश नरसिंह चिवटे
कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष