पंढरपूर प्रतिनिधी
बाळासाहेबांचे बेगडी प्रेम दाखवणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार ने सुरू केलेल्या आनंद शिधा वाटप पिशवी वर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सुध्दा टाकण्यासाठी गद्दारी केलेली आहे. यांनी आपले विचार जनतेला दाखवून दिले आहेत असे मत उद्धव ठाकरे शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी तेज न्यूजशी बोलताना व्यक्त केले आहे.
यावेळी शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे यांची करामत आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललोय आमची सेना बाळासाहेबांची सेना एवढं म्हणण्यापुरतं लोकांना सांगण्यापुरतं आहे.पण यांचं भाजप प्रेम चालू आहे. दिवाळी मध्ये आनंदाचा शिधा वाटप करताना दिसून आले आहे.
पिशवीच्या वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसतात पण ज्याच्या जीवावर मोठे झाले त्या बाळासाहेबांचा फोटो दिसत नाही याच्यावरूनच ओळखा यांची काय निष्ठा आहे ? या शिधा वाटपाचा बोजवारा उडाला आहे.कार्ड धारकांना काही ठिकाणी तेल मिळाले नाही तर काही ठिकाणी डाळ मिळाली नाही तसेच साखर,रवा चे हि झाले आहे. गोरगरीब जनतेची दिशाभूल केली आहे.नेमके दिवाळीत जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.मोदींजी १५ लाख रुपये खात्यावर जमा करणार म्हणाले आणि राज्य सरकारने फकत १०० रुपयात जनतेला गुंडाळले आहे.
त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.नाव मोठे लक्षण खोटे असे जनतेतून बोलले जात आहे. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक एवढेच यांचं धोरण आहे. मित्राहो लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र