भाळवणी प्रतिनिधी
ऊसदर संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने रविवार दि.23/10/2022रोजी संध्याकाळी 5=00 वाजता पंढरपूर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज चौक,पंढरपूर येथे ऊस परिषद आयोजित करण्यात आलेली असून या ऊस परिषदेस सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांनी सहभाग घ्यावा, यांचे निमंत्रण देण्याकरिता घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रयत शेतकरी संघटनेचे नेते दीपक भोसले यांनी दिली.
यावेळी व संघर्ष समितीचे माऊली हळनवर, सचिन पाटील, ज्ञानेश्वर जवळेकर, समाधान बागल, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची आयोजन व आभार प्रयत क्रांती संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी मांडले यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.