पुणे - सुभाष मुळे
जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वृत्तपत्रलेखक व पत्रकार गणेश हिरवे यांना साप्ताहिक भगवे वादळ यांच्या वतीने अंकाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या सोहळ्यात क्रांतीज्योती महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संपादक दत्ता खंदारे यांनी दिली असून येत्या ६ नोव्हेंबर रोजी धारावी मुंबई येथे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हिरवे अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, संस्कृतिक, आरोग्य, अध्यत्मिक क्षेत्रात काम करीत असून लॉकडाऊन मध्ये सुध्दा त्यांनी अनेक गरजू, वंचित घटकांना हर एक प्रकारे सहकार्य केलेलं आहे.कोणी ना कोणी आपल्या चांगल्या कार्याची दखल घेऊन सन्मानित करत असते. यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढते व पुरस्कार मिाल्याने आपल्याला अधिक जोमाने काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते असे हिरवे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सांगितले असून भगवे वादळ चे संपादक दत्ता खंदारे यांचे आभार मानले आहेत.
हिरवे सरांना आतापर्यंत ११९ पुरस्कार व करोनाच्या दोन वर्ष कालावधीत केलेल्या चांगल्या कामासाठी ७७ करोना योद्धा सन्मानपत्र मिळालेली आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने हिरवे सरांचे अनेक जणांनी अभिनंदन केलं आहे.