पंढरपूर प्रतिनिधी
भाळवणी गावचे सुपुत्र शिवाजीराजे बाबर यांची शिवसेना शिंदे गट पंढरपूर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या निमित्त त्यांचा सत्कार पंढरपूरचे युवा उद्योजक बालाजी उद्धव बागल यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाळवणी गावचे युवा नेतृत्व सुनील सराटे-पाटील,माजी सरपंच विठ्ठल चौगुले, गंगाधर माने , सिताराम मोरे,उपरी गावचे माजी सरपंच सतीश नागणे,पंढरपूर राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सुभाष(मंत्री) बागल,प्रसिद्ध कापड-उद्योग व्यापारी राजेश गुंड-पाटील , अतुल फाटे, आजिनाथ बागल, बाळासाहेब मिसाळ आदि मान्यवर उपस्थित होते.