सोलापूर प्रतिनिधी
मुंबई येथील अंधेरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे व देशाचे लक्ष लागले होते शिवसेनेने ही जागा जिंकणारच अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांनी केली याच मतदारसंघातून भाजपाकडून मुर्जी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु आज भारतीय जनता पक्षाने मनसे प्रमुख राज ठाकरे व शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार आपल्या पक्षाचे उमेदवारी मागे घेतल्याची जाहीर केले.
त्यामुळे शिवसेनेचा हा विजय मानला जातो म्हणून सोलापूर शिवसैनिकांनी जिल्हा संपर्कप्रमुख जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली आणि उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे यांच्या उपस्थितीत जुळे सोलापूर येथे शिवसेना शाखेवर जल्लोष साजरा करून नागरिकांना व सर्व पदाधिकारी एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा केले
यावेळी शिवसैनिकांनी आली रे आली मशाल आली, इकडून आली मशाल आली तिकडून आली मशाल आली 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ,उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ,कोण आला रे कोण आला शिवसेनेचा मशाल आला कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा दिल्या या जल्लोषामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता
सदर प्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील उपशहर प्रमुख राजू बिराजदार उपशहर प्रमुख रेवण बुक्कांनूरे उपशहर प्रमुख सचिन गंधूरे उपशहर प्रमुख , जोगदनकर उपशहर प्रमुख अजय खांडेकर विभाग प्रमुख सिद्धाराम कोरे शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक बनशील काटकर प्रा. श्रीशैल वाघमोडे सर अभिषेक चिलका विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोळी राहुल कोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते