मुंबई प्रतिनिधी - लक्ष्मण राजे
श्री समर्थ विद्यालय बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी पूर्व येथील २००० बॅच चे माजी विद्यार्थी नुकतेच कर्नाळा अभयारण्य येथे एक दिवसीय कार्यशाळेसाठी गेली होती.तिथे त्यांनी वृक्षारोपण केलं तसेच अभयारण्यविषयी माहिती जाणून घेतली. जवळपास वीस बावीस वर्षानी हे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते.
या सर्व विधर्थीना आठवण भेट म्हणून जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक गणेश हिरवे यांनी संस्कार धन २५ प्रती (जीवन मूल्य जपणारी) गोष्टीची पुस्तक भेट दिल्याची माहिती माजी विद्यार्थी सचिन अरोटे यांनी दिली व हिरवे सर कायमच आम्हाला व समाजाप्रती सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगून त्यांचा विनामूल्य पुस्तक भेट देण्याचा छंद कौतुक करण्यासारखाच आहे असे नमूद केलं.