सोलापूर प्रतिनिधी
लायन्स आंतरराष्ट्रीय अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने *ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत आजची अकरावी ॲक्टिविटी* म्हणून आसरा येथील सुरवसे हायस्कूल शाळेत दोन हजार विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून लायन्स क्लब ट्विन सिटी च्या माध्यमातून लायन राजीव देसाई व परिवाराच्या वतीने आज सुरवसे प्रशालेस प्रांतीय सभापती लायन सुरेश किरनल्ली यांच्या हस्ते आणि लायन राजीव व वरदा देसाई अध्यक्ष अभियंता लायन सागर पुकाळे खजिनदार लायन राजेश परसगोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी सिंटेक्स टाकी प्रदान करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष लायन सागर पुकाळे यांनी लायन्स क्लब सोलापुर ट्विन सिटी वर्षभरात आणि आणि विशेषत आक्टोंबर सेवा सप्ताह मध्ये कशा प्रकारे व कोणते कोणते काम केले याचा लेखाजोखा मांडत संपूर्ण सविस्तर माहिती सांगितले तर प्रमुख अतिथी लायन्स सुरेश किरनल्ली यांनी लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वेळोवेळी समाज्याची गरज ओळखून करत आसलेल्या कार्याचे कौतुक केले तर राजीव देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या यामागील भावना सांगितल्या.
त्यानंतर प्रशालेच्या वतीने प्रमुख अतिथी लायन सुरेश किरनल्ली डोनर राजीव देसाई क्लब अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे व खजिनदार राजेश परसगोंड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पर्यवेक्षक व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.