खिलारवाडी प्रतिनिधी
कै सोनाप्पा पांडुरंग शिंदे यांच्या स्मरणार्थ भाग्यश्री ब्रास बँड पुणे श्री राज उर्फ दाजी शिंदे यांच्या वतीने खिलारवाडी ता सांगोला येथील उपेक्षित वंचित घटकातील नागरिकांना दीपावली सणाच्या निमित्ताने मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा मारुती जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रा मारुती जाधव म्हणाले की अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उपजीविकेसाठी पुणे शहरात गेल्यानंतर आपल्या कष्टाच्या जीवावरती कोट्यावधीची संपत्ती निर्माण करत असताना राजु उर्फ दाजी शिंदे यांनी आपल्या मातीशी घट्ट नातं जिवंत ठेवल आहे कै सोनाप्पा शिंदे यांच्या कष्टाची जाणीव ठेवत स्वतः संपत्ती चा उपयोग घेण्यापेक्षा ती संपत्ती सर्वसामान्य रंजल्या गांजल्यांच्या हितासाठी आपण वापरत आहात याचा सार्थ अभिमान वाटतो राज शिंदे यांचे गोरगरिबांच्या मुखात सुखाचा घास भरण्याचे कार्य प्रेरणादायी आहे इतरांनी आदर्श घ्यावा असे प्रा जाधव यांनी सांगितले यावेळी गावातील शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमास सांगोल तालुका शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख नवल कुमार गाडे खिलारवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चंद्रकांत दादा बागल दत्तात्रय शिंदे कार्यक्रमाचे आयोजक राजू उर्फ दाजी शिंदे वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे प्रगतशील बागायतदार रामचंद्र तात्या बागल गोपाळ बागल तानाजीराव बागल विक्रम बागल बालाजीराव शिंदे उमेश चव्हाण संजय बागल पळशीचे सुरेश पाटील सागर भादुले व खिलारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.