कॅम्पस प्लेसमेंट मधून ' क्रेडिट सुईस ' या कंपनीत निवड
सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला ' मुस्तफा शेख ' यांची कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड झाली असून त्याला कंपनीकडून वार्षिक 13.5 लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट पूर्वी ट्रेनिंग दिले जाते. सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच जगातील नामवंत असलेल्या कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नॅशनल कंपनीत स्वतःचा ठसा उमटवून वेगळे व्यक्तिमत्व तयार करून आपले करिअर करीत आहेत.सोलापूर सिंहगड महाविद्यालयाने अल्पावधितच सातत्यपूर्ण निकाल, प्लेसमेंटची दर्जेदार वाटचाल करून जिल्ह्यात अग्रस्थान पटकावले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी सोलापूर सिंहगड महाविद्यालय अग्रेसर आहे.
विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. या सर्व गोष्टीमुळे सोलापूर सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजला नॅशनल अक्रेडिटेशन अँड अससमेंट कौन्सिल म्हणजे नॅक ' ए ' ग्रेड मिळाला आहे.क्रेडिट सुईस ही एक जागतिक गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा फर्म आहे ज्याची स्थापना स्वित्झर्लंडमध्ये झाली आहे.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे ,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे व तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.